Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

धक्कादायक : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना सांगवी पोलिसांनी केली अटक!

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. रुग्णालयात कोविड १९ वर उपचार घेणाऱ्यांना इलाजासाठी रेमडेसिविरची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे याचा मोठा तुटवडा संपूर्ण जिल्ह्यात जाणवत आहे. पण हीच इंजेक्शन्स काळ्याबाजारात अवाजवी किंमत मोजून मिळत आहेत. शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार फोफावत आहे, यामुळे शहरात रेमडेसिविरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप होत आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात ‘रेमडीसीवर’ या इंजक्शनची विक्री करण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करुन त्याच्या इतर तीन साथीदारांना ताब्यात घेतले. यांच्याकडे अधिक तपास केला असता बाणेर येथील कोविड सेंटर मधून अवैधरित्या ही ‘रेमडीसीवर’ची ३ इंजक्शन आणली असल्याचे सांगितले. इंजेक्शन वर असणाऱ्या छापील किंमती पेक्षा जास्त रक्कम घेऊन, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची कोणतेही चिट्ठी नसताना बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचे यावेळी उघड झाले.

यावेळी ‘रेमडीसीवर’ या इंजक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ इंजक्शन जप्त केली आहेत. आदित्य दीपक मेंदर्गी (२४, रा. पिंपरी), अजय गुरुदेव मोराळे (२७, रा. सांगवी) आणि मुरलीधर सुभाष मारुटकर (२४, रा. बाणेर) , प्रताप सुनील जाधव (२४ रा.तळेगाव दाभाडे) या चौघांना अटक केली आहे. तर औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १५ हजार रुपये किंमतीची ३ ‘रेमडीसीवर’ इंजक्शन आणि इतर ऐवज असा १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. परिस्थितीत काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई ही महत्वाची आहे. तपास सांगवी पोलीस करत आहेत.

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जाते. अनेक ठिकाणी साठा असूनही रुग्णांना बाहेरून हे इंजेक्शन आणायला सांगितले जाते. पण बाहेर रुग्णांना हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नसल्याने हैराण होतात. तर काही रुग्णालयांकडून खासगी वितरकांचे संपर्क रुग्णाच्या नातेवाईकांना देऊन ४ हजार ते १५ हजार रुपयांच्या किमतीत इंजेक्शन मिळवून दिले जात आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!