महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ फेब्रुवारी) : शिवसेनेच्या युवती युवासेना कार्यकर्त्या सौ. सुषमाताई अजित शेलार यांची भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर पुणे च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळेस भारतीय कामगार संघटने चे साजिद भाई खान (महाराष्ट्र अध्यक्ष), शकील भाई खान (महाराष्ट्र उपाध्यक्ष), सविताताई पुजारी (महाराष्ट्र महिला अध्यक्ष), राजभाऊ कुसाळकर (पुणे जिल्हा अध्यक्ष) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्याच बरोबर मावळ तालुका खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे व माजी आमदार श्री. गौतम चाबुंकस्वार यांनी ही त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड शहरात तसेच दापोडी भागात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी अग्रभागी असतात, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड झाल्याचे दिसून येते.
आजतागायत पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना पक्षाचे भारतीय कामगार सेनेच्या अन्तर्गत काम चालले होते. आता ऐनवेळी निवडणूकीच्या तोंडावर कंबर कसून पहिल्यादाच एका महिलेला भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी निवड करून एक नवीन इतिहास पिंपरी चिंचवड शहरामध्ये मांडला आहे. आता एक महिला कामगार क्षेत्रात आपली कामगिरी किती उत्तम रित्या पार पडतीये हे त्याच्या भावी कामगिरीतून दिसून येईल. तरी त्याच्या भावी कामगिरी साठी सर्व शिवसेना पक्षा कडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.