Google Ad
Editor Choice Maharashtra

आदर्शगाव ‘हिवरे बाजार’ चा निकाल जाहीर … पाहा राज्यातील ग्रामपंचायत मध्ये कोण, कुठे आघाडीवर …

महाराष्ट्र 14 न्यूज : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे ३० वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे.

अहमदनगरच्या मठ पिंपरी ग्रामपंचायतीत पहिल्या ३ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या संघर्ष ग्रामविकास मंडळाच्या पॅनलला मठ पिंपरीमध्ये एकूण ३ जागा मिळाल्या आहेत.

Google Ad

दरम्यान कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातून पहिली गुड न्यूज आल्याचं दिसत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात चुरस पाहताना दिसत आहे. खरंतर ही साधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी थेट बारामतीकरांचेही येथील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष आहे. त्यामुळेच मोहिते विरुद्ध मोहिते या लढतीचे महत्व वाढले आहे.

अशात हाती आलेल्या माहितीनुसार, माळशिरसमध्ये 3 ग्रामपंचायतींवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला झेंडा फडकवला आहे. माळशिरस दुसऱ्या टप्प्यात सर्व चारही ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा. येळीव , विजयवाडी , खळवे , विठ्ठलवाडी या ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाने जिंकल्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. त्यांच्या तालुक्यातील पहिला निकाल समोर आला असून तिथे भाजपने बाजी मारली आहे. अतूल भोसले यांच्या पॅनेलने 9 जागांवर विजय मिळवला आहे. धक्कादायक म्हणजे चव्हाण यांच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून हातकणंगले तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे.

साताऱ्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व यला मिळाले आहे. साताऱ्यातल्या उंब्रजमध्ये १४ पैकी १३ जागा भाजपच्या बाळासाहेब पाटील गटाला मिळाल्या आहेत.
सोलापूरमधील कुसमोड गावात विजयसिंह आणि धवलसिंह गटाला समान जागा मिळाल्याचे समोर येत आहे.

कोल्हापूरमधील हातकणंगलेतल्या पाडळीच्या ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य सरशी यला मिळत आहे. हातकणंगलेमधल्या पाडळीच्या ११ पैकी ११ जागा जनसुराज्य पक्षाकडे गेल्या आहेत.

कराडच्या खालकरवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली.

कराडमधील खुबी ग्रामपंचायतीमधील सर्व ९ जागा भाजपकडे आल्याचे समोर येत आहे. भाजपच्या अतुल भोसले गटाने खुबी ग्रामपंचायत जिंकली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!