Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : पुणे पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत … दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड , भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

Google Ad

🔴पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार :-

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )

संग्राम देशमुख (भाजप)

रुपाली पाटील ( मनसे )

शरद पाटील ( जनता दल )

सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )

श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)

डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)

अभिजित बिचुकले (अपक्ष)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!