Google Ad
Editor Choice Pune

Pune : लॉक डाऊन … भांडणाच्या रागात पत्नीन केला दरवाजा बंद अन …!

महाराष्ट्र 14 न्यूज : कौटुंबिक वादातून एका महिलेने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. लॉकडाऊन मध्ये पतीशी सतत शुल्लक कारणावरून वाद होते, या वादाला कंटाळून ३० वर्षीय भाग्यश्री अमेय पाटीलनं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना कोथरूड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री अमेय पाटील वास्तुविशारद असून लॉकडाऊन लागू झाल्यापासून घरून काम करत होती.

तर, पती अमेय पाटील इंजिनिअर असून तोही घरून काम करत होता. तीन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. गुरूवारी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर भाग्यश्री खोलीत निघून गेली. तिनं दरवाजा आतून बंद केला, दुसऱ्या दिवशी सकाळीही दरवाजा न उघडल्यानं अमेय घाबरला. अमेय पाटील यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

Google Ad

दार उघडल्यानंतर भाग्यश्रीनं गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. अमेय आणि शेजाऱ्यांनी लगेचच भाग्यश्रीला रुग्णालयात घेऊन गेले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान डॉक्टर या घटनेचा तपास करत असून, त्यांना खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. सध्या अलंकार पोलिसांनी या मृत्यूची नोंद अकस्मित मृत्यू अशी केली आहे. पोलीस सध्या भाग्यश्रीच्या घरच्यांशी चौकशी करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!