Google Ad
Editor Choice Pune

Pune : सिरमचे आदर पुनावाला यांची मोठी घोषणा … सप्टेंबरमध्ये येणार दुसरी Corona vaccine

महाराष्ट्र 14 न्यूज : कोविशिल्डनंतर (Covisheild) सीरम इन्स्टिट्यूट ( Serum Institute of India ) भारतीयांना आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला ( Adar Poonawalla ) यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. या लसीची ट्रायल भारतात सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे.

अमेरिकी कंपनी नोव्हावॅक्ससोबत (Novovax) भागीदारीने सीरम कोव्होवॅक्स (Covovax) लसीची भारतात निर्मिती करणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असणारी लस भारतात आलेली नव्हती. नवे स्ट्रेन (Corona new strain) हे भारतात लसी आल्यानंतर आढळू लागले होते. मात्र कोव्होवॅक्स ही लस आफ्रिकन आणि ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनवरही ८९ टक्के प्रभावी असल्याचं अदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Google Ad

भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला परवानगी मिळालेली आहे. सीरमने कोविशिल्ड लस ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापाठीसोबत भागीदारीने तयार केलेली. भारतासह परदेशातही अनेक ठिकाणी या लसीची निर्यात झाली. मात्र सध्या कोविशिल्डच्या निर्यातीला केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!