Google Ad
Editor Choice Pune

पुणे, पिंपरी – चिंचवड महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘ कोरोना ‘ रुग्ण दर आणि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात … अजित पवार

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘कोरोना’ रुग्ण दर आणि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना देवून ‘कोरोना’ रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (21 ऑगस्ट) दिले. विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे. तसेच कोरोनाबरोबरच पावसाळ्यातील अन्य संसर्गाचे आजार आणि सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”

Google Ad

“पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती आणि अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.”

दरम्यान, आज झालेल्या बैठकीला बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!