Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : ‘एक म्हणे पुन्हा येईन तर दुसरा म्हणे परत जाईन, … यावर अजितदादा म्हणाले, पण …

महाराष्ट्र 14 न्यूज : सत्ता नसल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अस्वस्थ आहेत. अजितदादांनी यावर एकाच दगडात दोन पक्षी मारले, एकजण म्हणत होते, “मी पुन्हा येईन’, आता दुसरे म्हणतात “मी परत जाईन’. पण मी म्हणतो तुम्हाला बोलावलं होतं कुणी? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्यावर टीका केली. पाटील आणि फडणवीस यांच्यावर टीका करताना मी मात्र, “पुन्हा येईन’ असेही म्हणत नाही आणि “परत जाईन’ असेही म्हणणार नाही, असे सांगालयाला अजितदादा विसरले नाहीत.

पुण्यात एका कार्यक्रमात शनिवारी (ता. 26 डिसेंबर) बोलताना पवार यांनी चंद्रकात पाटील यांनी शुक्रवारी (ता. 25 डिसेंबर) एका कार्यक्रमात पुण्यात बोलताना सर्वजण पुण्यात राहण्याचा, पुणेकर होण्याचा प्रयत्न करतात. मी मात्र, कोल्हापूरला परत जाणार असल्याचे म्हटले होते. त्याचा संदर्भ देत पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील भाजप नेते का चर्चा करीत नाहीत?

Google Ad

मराठा आरक्षणाबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री म्हणाले की, “या विषयात कोणताही निर्णय घेतला तरी दोन मतप्रवाह दिसतात. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. राज्य सरकार शक्‍य ते सर्व प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा सारासार विचार करून “ईडब्लूएस’च्या आरक्षणाबाबात निर्णय घेण्यात आला आहे.’ नववर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडत आहेत. मात्र, इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे विषाणू सापडले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात 23 गावांचा समावेश केला, तर नियोजनबद्ध विकास होईल. या भूमिकेतून हा निर्णय घेतला आहे. त्यात कोणतेही राजकारण नाही. या संदर्भातील चर्चांना काहीही अर्थ नाही. मुळात हा निर्णय महापालिका निवडणुका समोर ठेऊन घेण्यात आलेला नाही. विरोधकांची या संदर्भातील भूमिका म्हणजे नाचता येईना; अंगण वाकडे, अशी परिस्थिती असल्याचे पवार यांनी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!