Google Ad
Editor Choice Maharashtra

पुणे पदवीधर मतदार संघ मतमोजणीला सुरुवात …कोण मारणार बाजी? … विजयासाठी हवीत एवढी मतं!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा प्रथमच महाविकास आघाडीनं एकत्र निवडणुक लढविली आहे. भाजपच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आज गुरुवारी (ता.3) मतमोजणी असल्याने सगळ्यांनाच त्यांची उत्सुकता आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 1 लाख 53 हजार 171 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत विजयी होईल. तर ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 25 हजार 390 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत विजयी होणार आहे, अशी शक्यता पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो यांनी व्यक्त केली.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे मतदारांना मतदान करताना लक्ष विचलित करण्यात कारणीभूत ठरले असले तरी पदवीधर मतदार संघ निवडणूकीची मतमोजणी पद्धत क्लिष्ट असते. सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने त्याचा थेट फायदा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनाच होणार असल्याचे पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरोने केलेल्या अभ्यासात आढळले आहे.

Google Ad

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020
मतदार संख्या- 426257
मतदान संख्या- 247050
उमेदवार संख्या- 62
पहिल्या पसंती मतांचा कोटा- 153171
(अंतिम मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोठ्यामध्ये बदल होऊ शकतो.)
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2020
मतदार संख्या- 72545
मतदान संख्या- 52987
उमेदवार संख्या- 35
पहिल्या पसंती मतांचा कोटा- 25390
(अंतिम मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोठ्यामध्ये बदल होऊ शकतो.)

ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 1 लाख 53 हजार 171 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत विजयी होईल. अंतिम मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोटा मध्ये बदल होऊ शकतो. जर 62 उमेदवारांपैकी पहिल्या पसंती मतांचा कोटामध्ये विजयी न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाचा कोटा निश्चित करून मतमोजणी केली जाते. म्हणजेच सर्व दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची गणना होते. त्यामध्येही विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यास सर्वाधिक कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मते प्रमुख व प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनुक्रमे मते अधिक समाविष्ट केली जातात व त्यानुसार मतमोजणीची गणती होत असते. या सर्व पद्धतीचा व उमेदवारांना मिळालेल्या मतदारांच्या प्रतिसादानुसार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते.

शिक्षक मतदारसंघामध्ये ३५ उमेदवार असल्याने तुलनेने कमी आकाराची मतपत्रिका होती. विभागात पदवीधर मतदारसंघासाठी १२०२ ; तर शिक्षक मतदारसंघासाठी ३६७ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्‍म निरीक्षक यांच्‍यासह सात हजार ४१; तर शिक्षक मतदारसंघासाठी तीन हजार ११६ असे दहा हजार १५७ अधिकारी आणि कर्मचारी होते. तर दोन हजार ९१७ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली होती.
या निवडणुकीत पसंतीक्रमाने मतदान करण्याची प्रक्रिया आणि पदवीधरसाठी ६२, तर शिक्षकसाठी ३५ उमेदवार रिंगणात असल्याने मतमोजणी करण्यासाठी किमान दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी रात्री किंवा ४ डिसेंबरला प्रशासनाकडून अधिकृत जाहीर होणार आहे.

पुणे विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका बालेवाडी येथे आणण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज ३ डिसेंबरला सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीर अंतराचे पालन करूनच ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मतमोजणीचे काम वाटून देण्यात आले आहे. यंदा दोन्ही मतदारसंघांमध्ये जास्त उमेदवार, कोरोनामुळे वाढवण्यात आलेली मतदान केंद्रे आणि उच्चांकी झालेले मतदान या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या प्रक्रियेस वेळ लागणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!