Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यातील दीपक मारटकर हत्याप्रकरणी आणखी चौघांना अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हत्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी चौघांना अटक केली . तर दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे . आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे . सनी कोलते , राहूल श्रीनिवास रागीर , रोहित क्षिरसागर व रोहित कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत .

दीपक मारटकर यांची गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सपासप वार हत्या करण्यात आली . शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते . याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यासह 8 जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अश्विनी कांबळे , महेंद्र सराफ आणी निरंजण म्हंकाळे यांना अटक केली होती . त्यानंतर रविवारी चौघांना अटक करण्यात आली आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!