Google Ad
Editor Choice Pune

Pune : प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर अखेर सापडले … का सोडले होते घर?

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील पाषाणकर उद्योग समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली होती. त्याबरोबरच गौतम पाषाणकर यांनी जीवन संपवण्याबाबत लिहिलेली चिट्ठी हाती लागल्यानं खळबळ उडाली होती.

पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरू झाली होती. यानंतर ते कोल्हापूरमध्ये असल्याचं समजताच पुण्यातील पोलिसांचं पथक त्यांच्या शोधासाठी कोल्हापूरला रवाना करण्यात आले होते.

Google Ad

एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दिसल्याच सांगण्यात आलं होतं. मात्र, यानंतरही पोलिसांच्या हाती ते लागले नव्हते. अखेर आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्यांचा शोध घेण्यास यश आलं आहे. पोलिसांच्या या पथकाने राजस्थानमधील जयपूर शहरातून त्यांना ताब्यात घेतलं आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलिसांना त्यांचा शोध घेण्यास यश आले असून ते तेथील एका हॉटेलमध्ये निवास करत असल्याचं समजत आहे.

म्हणून त्यांनी सोडले घर!
कोरोनामुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीचा फटका इतर उद्योजक, व्यावसायिकांप्रमाणेच पाषाणकर यांनाही फटका बसला. त्याचा पाषाणकर यांच्या मनावर परिणाम झाला. त्यांनी कर्जाच्या कारणावरुनच घर सोडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित असून तब्येतही चांगली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतर अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे व पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार, युनीट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या पथकाने पाषाणकर यांचा शोध घेतला. त्यांच्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस कर्मचारी योगेश जगताप, अय्याज दड्डीकर, बानगुडे यांचा समावेश होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

67 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!