Google Ad
Editor Choice Pune

Pune : अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक … झाले, हे महत्त्वाचे निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सुपर स्प्रेडर शोधण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यापर्यंतचे निर्णय घेतानाच सारी तापाचे रुग्ण शोधण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लानही तयार करण्यात आला.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे

Google Ad

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी. बी.कदम आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाचे निर्णय

जिल्ह्यात लॉकडाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी

>  200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम

>> रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)
>> हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रीत करा.
>> मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा.
>> जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करा.
>> नमुना तपासण्यांची संख्या वाढवा.
>> मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा.
>> नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!