Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यातील ‘ या ‘ ठिकाणी जाणं टाळा … आता इथं आहे कोरोनाचा सर्वात जास्त धोका

महाराष्ट्र 14 न्यूज : देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. पुण्यात कोरोनानं सर्वाधिक थैमान घातलं होतं. अथक प्रयत्नांनंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पुण्याला यश मिळालं होतं. गेले काही दिवस रुग्ण संख्या कमी झाली होती पण आता कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. पुण्यात ठिक ठिकाणी आता कोरोनानं आपले नवे हॉटस्पॉट्स बनवले आहेत.

गेले काही दिवस पुण्यातील कोरना रुग्णांची आकडेवारीही कमी झाली होती. पुणेकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. कोरोना रुग्णांची कमी होणारी ही संख्या पाहून पुणेकरांनादेखील दिलासा मिळाला. पण हा दिलासा तात्पुरताच होता. कारण आता पुण्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुणेकरांना आता अधिक सावध राहण्याची गरज आहे.

Google Ad


पुण्यातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. जुन्या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण कोरोनाने आपले नवे हॉटस्पॉट तयार केले आहेत आणि या नव्या हॉटस्पॉटमध्ये झपाट्यानं रुग्ण वाढत आहेत. सिंहगड परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

पुण्यातील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट :-

सिंहगड परिसर – 44 रुग्ण

बिबवेवाडी – 39 रुग्ण

नगररोड – वडगाव शेरी – 37 रुग्ण

वारजे – कर्वेनगर – 36 रुग्ण

हडपसर- मुंढवा – 33 रुग्ण

कोथरूड – बावधन – 27 रुग्ण

ढोले पाटील रोड – 11 रुग्ण

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!