Google Ad
Editor Choice Pune

Pune : लॉक डाऊनचे नियम न पाळणा – या पुण्यातील या हॉटेल चालक व मालक यांचेवर कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालय , यांनी कोरोनाच्या काळात दिलेले आदेशाचे पालन न करणा – या कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल आस्थापनांवर कारवाई करण्याचे वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्याने वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे पोलिस पथकाने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल मर्फीज , लेन नं . ०६ , कोरेगाव पार्क , पुणे , हॉटेल टल्ली , लेन नं . ०७ , कोरेगाव पार्क , पुणे, हॉटेल द डेली , लेन नं . ०७ , कोरेगाव पार्क , पुणे, हॉटेल पब्लीक , लेन नं . ०७ , कोरेगाव पार्क , पुणे यांची पोलिसांनी तपासणी केली.

या पोलिस तपासणीत हॉटेलमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असल्याचे निदर्शनास आले तसेच आदेशात नमुद केलेप्रमाणे बाहृय दर्शनी भागात बोर्डावर आसन क्षमता व हॉटेल आस्थापनेमधील ग्राहक संख्या याची माहीती देणे बंधनकारक असल्याने ती माहीती नमुद न करता हॉटेल सेवा पुरवित असताना कोरोना विषाणुचा संसर्ग पसरविण्याची हयगयीने कृती करताना मिळुन आल्याने हॉटेल मालक व मॅनेजर यांचेवर भा . दं . वि . कलम १८८ , २६ ९ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Google Ad

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त साो . पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर श्री . डॉ . संजय शिंदे , पोलीस उप – आयुक्त परिमंडळ -२ , पुणे शहर श्री . सागर पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग , पुणे शहर श्री . चंद्रकांत सांगळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन श्री . दिलीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे , कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन श्रीमती गलांडे , पोलीस उप – निरीक्षक , श्री . रूपेश चाळके , पो . ना . ७६८१ हरीहर , पोलीस शिपाई ८५३५ जाधव , पोलीस शिपाई ८५२४ लांडे , पोलीस शिपाई ८६१७ पवार , पोलीस शिपाई ८७२६ वाघमोडे , म . पो . शि.९ ४०२ कापसे , म.पो.शि.९ ३ ९ ५ कुंभार , म.पो.शि. ८ ९ ७० पवार यांचे पथकाने केली असुन पुढील तपास पोलीस उप – निरीक्षक श्री . रूपेश चाळके करीत आहेत .

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!