Google Ad
Celebrities Editor Choice Movies

बॉलिवूडमध्ये मोनोपॉलीवर प्रियंका चोप्रा बोलली … खास लोकांवर प्रियंकाचा निशाणा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जून) : अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास आपल्या स्टाईलपासून ते अभिनयापर्यंत कायम चर्चेत असते. नुकतीच प्रियांका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टीविषयी बर्‍याच गोष्टी सांगितल्या. यावेळी प्रियंकाने ओटीटी प्लॅटफॉर्मनं कसं बॉलिवूड आणि सिनेसृष्टीतील लोकशाही व्यवस्थेत रूपांतर केलं आणि नवख्या कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखविण्याची संधी कशी दिली हे सांगितलं.

अशा प्रकारे संपतेय मोनोपोली
प्रियंका चोप्रा म्हणाली की, ”ओटीटी प्लॅटफॉर्म बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील मोनोपॉली काढून टाकत आहे. नाहीतर याआधी फिल्म इंडस्ट्री काही विशिष्ट लोकांच्या हातची बाहुली होती.

Google Ad

प्रियांका म्हणाली, ‘हे खूप छान आहे, नवीन लोक, नवीन लेखक, नवीन कलाकार, नवीन चित्रपट निर्माते यांना उद्योगात पुढे येण्याची संधी मिळत आहे. जे यापूर्वी विशिष्ट लोकांच्या मक्तेदारीचा बळी ठरला होता. भारतीय सिनेमाच्या वाढीसाठी ही चांगली वेळ आहे.

आता बदलला आहे फॉर्म्युला
प्रियंका चोप्राने एका कार्यक्रमात बॉलिवूडच्या फॉर्म्युलावर जोर दिला. ते म्हणाले, ‘भारतीय सिनेमात तुम्ही पाहू शकता की, ओटीटी लोकांना मोठ्या कल्पना पुढे नेण्याची कशी संधी देत. यापूर्वी असं कोणताही फॉर्म्युला नव्हता आणि असं विषय सहजपणे पुढे ठेवले जात नव्हते. पूर्वी पाच गाणी असायची, सिनेमात फायटींग सीन असायचे, जे आता नाही. आता लोकांना वास्तविक आणि सत्य कथा पहायला आवडतात. हे लोकांशी जास्त कनेक्ट आहे.

प्रियंकाने सांगितली आपली इच्छा

प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, ‘जगातील सगळ्यात मोठ्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये भाग घेण्याचा बहुमान मला मिळाला यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. माझी इच्छा आहे की दक्षिण आशियातील लोकांनीही दक्षिण आशियाबाहेर आपला ठसा उमटवावा.

या चित्रपटात दिसली होती
प्रियंका चोप्रा याआधी ‘व्हाईट टायगर’ चित्रपटात दिसली होती. प्रियांका बर्‍याच दिवसांपासून लंडनमध्ये होती. नुकतीच ती अमेरिकेत परतली. कोरोनामुळे ती आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!