Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगावीतील शिवप्रेमींनी तिथीप्रमाणे साजरा केला शिवराज्याभिषेक दिन म्हणून … हिंदू साम्राज्य दिन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जून) : हर हर महादेव… जय भवानी, जय शिवराय… छत्रपती शिवाजी महाराज की जयचा अखंड जयघोष… अशा वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.

नवी सांगावी येथील स्वामी विवेकानंद नगर मंडळाच्या वतीने आज बुधवार (दि.२३ जून) रोजी तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन कार्यक्रमानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हा दिवस ‘हिंदू साम्राज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

Google Ad

यावेळी ‘डॉ.देविदास शेलार’ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अभिवादन पूजन संपन्न झाले. तरी यावेळी उपस्थित ‘प्रा. भरत शिंदे’ यांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची तथा चारित्र्याची तसेच १६७४ साली तिथीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला याची माहिती उपस्थितांना सांगितली.

यावेळी संघ कार्यकर्ते जतीन गाजरे – प्रस्तावना केली, प्रा. भरत शिंदे – वक्ते, रूपेश कोडीलकर, मनोज पाटील, कालिदास राऊत, चंद्रकांत साकरे, संजय लोहकरे – नगर कार्यवाह सांगवी नगर, सचिन महाडिक – धर्म जागरण समिती प्रमुख नवी सांगवी सुनील पांडे, अक्षय भालेराव, संकेत लाड आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. सुहास बसुदे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!