Google Ad
Editor Choice Pune

रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी … खरेदी विक्री बाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले हे आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १० एप्रिल : पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्या विचारात घेता रेमडेसीशीवीर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच त्याचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याची विक्री वितरण सुनियंत्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे . याकरिता डॉ राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , यांनी सर्व कोविड रुग्णालय संलग्न फार्मसी / मेडीकल स्टोअर , रेमडेसीव्हीर इंजेक्शन चे डिस्ट्रीब्युटर व कंपनीचे सी ॲण्ड एफ एजंट यांना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत .

१. रुग्णालयांनी कोषिष्ट रुग्णालय सुरु करण्यापूर्वी त्यांच्या हददीतील सक्षम आरोग्य अधिकारी यांचेकडे कोविड हॉस्पीटल म्हणून नोंद करणे आवश्यक असून त्याची माहिती दररोज पुणे विभागाच्या डॅशबोर्डवर भरणे बंधनकारक आहे .

Google Ad

२. कोवीड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यताप्राप्त असलेले प्रमाणपत्र त्यांचे संलग्न असलेले मेडिकल स्टोअर चे परवाने यांचेसह पाकक औषध विक्रेता किंवा सी अंण्ड एफ एजंट यांचेकडे लेखी मागणी नोंदवावी .

३. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी करताना रुग्णालयामधील रुग्णसंख्या विचारात घेऊन व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडेसीवीर ची आवश्यकता आहे अशी संख्या विचारात घेऊन तीन दिवस पुरेल एवढया इंजेक्शन साठयाची मागणी नोंदवावी . सदर औषधांची मागणी नोंदवण्यापुर्वी केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा कोविड क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा .

४. पाऊक औषध विषयांनी किंवा सी अण्ड एफ एजंट यांनी रुग्णांची कागदपत्रांची योग्य प्रकारे शहानिशा केल्यानंतर संबंधीत काणालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा व त्याचायतचे सर्व अभिलेख जतन करावे .

 

५. कोविड रुग्णालयाशी संलग्न नसलेले किरकोळ औषध विक्रेत्यांना रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करू नये.

६. सर्व घाऊक औषध विक्रेत्यांनी
किंवा सी ऑण्ड एफ एजेंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शनची माहिती उदा . कोविड रुग्णालयाचे नांव , संलगन मेडिकल चे नांव , बिल क्रमांक दिनांक एकुण विक्री संख्या इत्यादी मान्यतची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयास यांना दररोज सादर करावी .

७. ज्या रुग्णालयांच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर्स नाही त्यांनी स्वतः रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी अॅण्ड एफ ऐजंट यांचेकडून करावी . तसेच औषधे च सौदर्य प्रसाधने कायदयातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा व त्यामध्ये रजिस्टर ठेवून त्यात दिनांक दिवसाच्या सुरुवातीचा साठा , पुरवठा दाराचे नांव , बिल क्रमांक सारेदी केलेला साठा , औषधाचे नाव , समूह क्रमांक , औषध पुरवठ्याचा दिनांक , रुग्णांचा तपशील , पुरवलेले इंजेक्शन , डॉक्टरांचे नाव , आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यावत ठेवावी . इंजेक्शनचा खरेदी वापर विक्री व शिल्लक साठा यांचा ताळमेळ ठेवावा .

८. राणालयांनी स्वतः कोविड रुग्णांना औषधे उपलब्ध करुन दयावीत . रुग्णांच्या नातेवाईकास बाहेरुन घेऊन येण्यास सांगुनये .

९ . कोविड रुग्णालयाने रुग्णांना औषधांची किंमत्त शासनमान्य दरानेच आकारावी .

१० , काही कारणांने रेमडेसीव्हीर इंजेक्शन या औषधाचा पुर्ण डोस देण्यात आला नाही तर त्याचा उर्वरित साठा हॉस्पीटल मेडिकल स्टोअर्स यामध्ये परत कराया व त्याचे अभिलेख ठेवावे .

११. कोविड रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांचेवर बारीक लक्ष ठेवावे व रुग्णालयामध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी . रुग्णालयात गैरप्रकार आढळून आल्यास रुग्णालय व्यवस्थापनास जबाबादार धरण्यात येईल .

सदर आदेश दिनांक ११/४/२०२१ पासून अंमलात येतील . सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ तसेच भारतीय दंड विधान १८६० चे कलम १८८ व औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा १ ९ ४० व नियम १ ९ ४५ प्रमाणे सर्व दंडनिय कार्यवाहीस – पात्र राहील . असे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!