Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ८८६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि. ३० जुलै २०२० ) रोजी ९१९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ८८६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ३३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण पिंपरी ( स्त्री५५ वर्षे ) , पिंपळे गुरव ( स्त्री ७५ वर्षे ) चिखली ( पुरुष ४२ वर्षे , पुरुष ५१ वर्षे , पुरुष ६६ वर्षे ) , मोरवाडी ( पुरुष ५७ वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ६५ वर्षे , पुरुष ६२ वर्षे ) , ) , थेरगाव ( पुरुष ३६ वर्षे ) , संत तुकारामनगर पिंपरी ( पुरुष ७४ वर्षे ) , मोशी ( पुरुष ७० वर्षे ) , रुपीनगर ( पुरुष ४१ वर्षे ) , चिंचवड गाव ( स्त्री ७५ वर्षे ) , नेहरुनगर ( पुरुष ७५ वर्षे ) , विद्यानगर चिंचवड ( पुरुष ५५ वर्षे ) , निगडी ( स्त्री ४१ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये , तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!