Google Ad
Editor Choice Education Maharashtra

GOOD NEWS : १ ऑगस्ट पासून राज्यात आयटीआय प्रेवेश प्रक्रिया सुरू … सविस्तर पहा!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे . आयटीआय प्रवेशाची तारीख देखील जाहीर करण्यात आलीय . आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार आहे . ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in y संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत . कौशल्य विकास , रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली . दरम्यान दहावी उत्तीर्ण , अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले .

प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले . ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९ २ हजार ५५६ इतकी आहे . आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था , अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था , अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या , महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी ( आश्रमशाळा ) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.

Google Ad

राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे . शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे . किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही .

दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.यंदा प्रवेश अर्ज भरण्यापासून हरकती नोंदविण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये , विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलायं

.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!