Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहारत आज कोरोनाचे आढळले ७४८ रुग्ण … तर ७२७ रुग्ण कोरोना मुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि. ३ ऑगस्ट २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ७४८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर आज ७२७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले .

आज मृत झालेले रुग्ण भोसरी (स्त्री ५५ वर्षे, पुरुष ६० वर्षे, स्त्री ९० वर्षे), दापोडी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष ७२ वर्षे), सांगवी (पुरुष ९२ वर्षे, पुरुष २७ वर्षे), पिंपरी (स्त्री ६७ वर्षे,पुरुष ५८ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ३० वर्षे, पुरुष ६१ वर्षे), थेरगाव (पुरुष ४९ वर्षे, पुरुष ५९ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), काळेवाडी (पुरुष ६५ वर्षे), निगडी (पुरुष ६४ वर्षे), फुगेवाडी (स्त्री ५९ वर्षे), माण (पुरुष ६८ वर्षे), फुरसुंगी (पुरुष ७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!