Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Pimpri : वीज बिलाबाबत नागरिकांच्या येत असलेल्या तक्रारी बाबत ‘आमदार आण्णा बनसोडे’ यांना दिले निवेदन!

महाराष्ट्र 14 न्यूज : आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीनं शॉक दिलाय. लॉकडाऊन काळात आणि आता लॉकडाऊन संपल्यानंतरही आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे नागरिक हैराण आहेत. महावितरण वीज कंपनीने ग्राहकांची विजबिलं कमी केलीच नाहीत, उलट वाढवलीयेत. वीज वितरण कंपन्या स्वत:चं तिजोरी भरण्याचं काम करत असल्यानं नागरिक संतप्त झालेत.

वीज बीलाबद्दल नागरिकांच्या येत असलेल्या तकारी बाबत आमदार आण्णा बनसोडे यांना ‘दीपक भोजने’ शहर अध्यक्ष -ऑल इंडिया धनगर महासंघ, (दिल्ली) पिंपरी चिंचवड शहर यांनी निवेदन दिले आहे. लॉकडाऊन काळात महावितरण कडुन मीटर रिडिंग न घेता बील देण्यात आले , नागरीकांना ऑनलाईन बील काढुन वीज बील भरण्यास सांगितले अशा प्रकारे नागरिकांनी बीले भरली . परंतु जुन महिन्यात आलेली वीले जास्त दराने लावलेली आहे . त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे .

Google Ad

महावितरण कंपनी कडुन नागरिकांना जो मनस्ताप झाला तो दुर करावा . नागरिकांना योग्य वीज बील देण्यास महावितरण कंपनीस ताकीद देण्यात यावी अशी मागणी दिपक ज्ञानदेव भोजने यांनी केली आहे. यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांना पत्र देताना त्यांची चर्चा केली असता महावितरणचे स्थानिक वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून वेळ पडल्यास उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्याकडे पाठपुरवा करू असे आश्वासन आण्णा बनसोडे यांनी दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!