Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.1 ए या 4.41 कि.मी. उन्नत मेट्रो मार्गिकेस … आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता 

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.1 ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी 946 कोटी 73 लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर 170 कोटी 3 लाख इतका खर्चाचा भार असेल.

Google Ad

या मार्गिकेची लांबी 4.41 कि.मी. इतकी असून यात 3 स्थानके आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाचे एकूण खर्चाच्या 10 टक्के सहभाग असून कर्जाच्या स्वरुपात देखील निधी उभारण्यात येणार आहे.

राज्य शासनाचा एकूण 79 कोटी 4 लाख तसेच 90 कोटी 63 लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण 170 कोटी 3 लाख असा सहभाग असेल. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी 2023 मध्ये 4.95 लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल असा अंदाज आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

36 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!