Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बेघरांसाठी निवारा … जागविला माणुसकीचा धर्म!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . १० ऑक्टोबर २०२० ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बेघरांसाठी निवारा केंद्र सुरू करुन त्यांना आधार देण्याचे काम सुरु केले आहे . या माध्यमातून बेघरांना प्रशिक्षण देवुन स्वत : च्या पायावर उभे करण्यात येणार आहे , त्यामुळे हा पथदर्शी उपक्रम असुन इतरांसाठी आदर्श ठरणारा आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले .

जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथे शहरातील बेघरांसाठी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे . या केंद्राचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , उपआयुक्त अजय चारठणकर , मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण , समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले

Google Ad

सहा . समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे , माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक , बार्टी संस्थेच्या संगिता शहाडे , रियल लाईफ रियल पिपल संस्थेचे एम.एम.हुसेन , सी.वाय.डी.ए.संस्थेचे मॉथु , एन.यु.एल.एम.चे तांत्रिक तंज संजीव धुळम आदी उपस्थित होते . महापौर माई ढोरे म्हणाल्या महानगरपालिकेने सुरु केलेला निवारा केंद्राचा उपक्रम इतरांपेक्षा वेगळा आहे , याठिकाणी बेघरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत . त्यांच्या साठी स्वत : चा तात्पुरत्या स्वरुपात निवारा असावा यासाठी हा उपक्रम महत्वपुर्ण ठरणार आहे . बेघरांबाबत नागरीकांमध्ये आस्था निर्माण झाली पाहीजे , तसेच ते देखिल देशाचे नागरीक आहेत .

त्यांना आधार व सहानभुतीची गरज असून समाजाने सहकार्य केल्यास ते आपल्या आयुष्यात नव्याने उभारी घेऊ शकतील असेही त्या म्हणाल्या . सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या भाषणात उपेक्षितांना जीवन जगता आले पाहीजे तरच त्याला विकास म्हणता येईल , यासाठी पालिकेने सुरु केलेले निवारा केंद्र अशा गरजूंसाठी त्यांचे जीवनमान उंचावणारा आदर्श उपक्रम ठरणार आहे.असे सांगून त्यांनी बेघरांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्यास या माध्यमातुन बेघर देखिल आपल्या पायावर उभे राहून नव्या उमेदीने जगण्याचा मार्ग निर्माण करतील असेही ते म्हणाले .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!