Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘इ’ क्षेत्रीय कार्यालय वडमुखवाडी व मोशी भागातील रेड झोन मधील ४० अनधिकृत बांधकामावर पिंपरी चिंचवड मनपाने फिरवला बुलडोझर!

 

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘ इ ‘ क्षेत्रिय कार्यालय मौजे वडमुखवाडी व मौजे मोशी ( प्रभाग क्र ३ ) भागातील रेड झोन मधील अनधिकृत बांधकामावर आज दि ०८/०२/२०२१ रोजी महापालिकेची बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली . सदर कारवाई मध्ये एकूण ४० अनधिकृत बांधकाम असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ४८०१० चौ .फूट बांधकाम पाडण्यात आली .

Google Ad

सदर कारवाई मा , अतिरिक्त आयुक्त -२ श्री . अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , सह शहर अभियंता श्री मकरंद निकम यांचे उपस्थितीत तसेच मा कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राणे यांचे नियंत्रणाखाली उपअभियंता श्री हेमंत देसाई , श्री सुर्यकांत मोहित , श्री . सुधीर मोरे तसेच ५ कनिष्ठ अभियंता व एकूण ३५ बीट ऑफीसर तसेच सदर कारवाईसाठी पोलीस विभागामार्फत डी.सी.पी श्री . सुधीर हिरेमठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मोहन शिंदे , श्री शिवाजी गवारे , ४ पी.आय , ५ पी.एस.आय व ४२ पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली सदर कारवाई साठी ३ पोकलेन , ५ जेसीबी , २५ मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता .

सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री अजित पवार यांनी सदर ठिकाणी दि ० ९ / २ / २०२१ रोजी देखील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार असुन सदर बांधकाम धारकांना बांधकाम काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे . कार्यकारी अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग पिंपरी चिंचवड मनपा यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!