Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदी सौ. तृप्ती तानाजी जवळकर यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदी सौ. तृप्ती तानाजी जवळकर यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

सिझन हॉल दुर्गा चौक निगडी येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी सौ. वैशाली काळभोर – महिला अध्यक्ष पिं.चिं. रा. काँग्रेस, संजोग वाघिरे – अध्यक्ष पिं.चिं. रा. काँग्रेस, प्रशांत शितोळे – कार्याध्यक्ष पिं.चिं. रा. काँग्रेस आणि नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पिंपळे गुरव भागातील सामाजिक कार्याची दखल घेत, सौ.तृप्ती तानाजी जवळकर यांना प्रभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

Google Ad

या निवडीच्या वेळी बोलताना तृप्तीताई जवळकर म्हणाल्या ” पिंपळे गुरव येथील महिलांना सक्षमीकरणासाठी आपण चांगल्या प्रकारे सहकार्य करु व कोरोनाच्या संकट काळात महिलांना बचत गटामार्फत कसा रोजगार मिळेल यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊन तो मिळवुन देण्यास प्रयत्नशिल राहू, तसेच मला दिलेल्या संधीचा उपयोग मी तळागाळातील गोरगरिबांना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी करेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!