Google Ad
Editor Choice Education

तळेगाव लायन्स क्लबने यावर्षी महिला सबलीकरणचा कायमस्वरूपी प्रकल्प घेतला हाती

लायन्स– महिला सबलीकरण संकल्प!- मनी न यावा कोणताही विकल्प!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑक्टोबर) : जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणाऱ्या पन्नास वर्षाच्या सामाजिक कार्याची उज्वल परंपरा असलेल्या लायन्स क्लब तळेगावने यावर्षी महिला सबलीकरणचा कायमस्वरूपी प्रकल्प हाती घेतलेला आहे! या प्रकल्पाचा मुहूर्त लायन्स क्लबने दत्तक घेतलेल्या डोणे गावात करण्यात आला ! ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यात ज्येष्ठ ला. नंदकुमार काळोखे आणि तळेगावातील टॉप टेक या कंपनीचे प्रसिद्ध उद्योजक महेश महाजन या दोघांचा सिंहाचा वाटा आहे!

या कंपनीमार्फत वायरिंग हार्नेस हा प्रत्येक दुचाकी/ चारचाकी वाहनांना आवश्यक असणारा पार्ट बनवण्याचं काम जवळजवळ 100 महिलांना प्रत्येकी 270 ते 300 रुपये रोजगार मिळवून देणारा आहे! या प्रकल्पाचा उद्घघाटन समारंभ सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी माजी प्रांतपाल लायन डॉक्टर दीपकभाई शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ला. अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्व उपस्थितांचे लायन्स क्लब तर्फे स्वागत केलं! प्रकल्प प्रमुख ज्येष्ठ लायन नंदकुमार काळोखे यांनी आपल्या प्रास्ताविकात हा प्रकल्प उभारण्या मागची लायन्स क्लब तळेगावची संकल्पना अत्यंत भिज शब्दात व्यक्त केली! आपल्या उद्घ घाटनपर भाषणात- माजी प्रांतपाल डॉक्टर दीपकभाई यांनी -डोणे ग्रामस्थांना हे स्वयंरोजगार केंद्र चालवण्याची सर्वस्वी आपली जबाबदारी आहे हे स्पष्ट केले!

Google Ad

1000 स्क्वेअर फुटाची मोठी शेड उभारण्यास लागणाऱ्या पाच लाख रुपये खर्चातील 60 टक्के रक्कम माझी असेल असेही त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलं, प्रसिद्ध उद्योजक महेश महाजन यांनी याच प्रकल्पाद्वारे जास्तीत जास्त महिलांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, त्यासाठी आपल्या प्रामाणिक श्रमाची आणि सहकार्याची आवश्यकता आहे हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच लायन सौ निरूपमा कानेटकर याही प्रमुख पाहुण्या होत्या! त्यांनी आपल्या मनो गतात -उपस्थित माता-भगिनींना- त्यांच्यात वसत असलेल्या स्त्रीशक्तीची जाणीव करून दिली! यासाठी त्यांनी स्वतःचं उदाहरण देऊन उपस्थिताची मन जिंकलीत! विशेष अतिथी म्हणून आलेले झोन चेअरमन लायन सुधीर कदम यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या!

ज्येष्ठ लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी- देव दगडाच्या मूर्तीत नसतो- तो प्रत्येकाच्या हृदयात चैतन्य स्वरूप असतो हे आपल्या काव्यपंक्तीतून स्पष्ट केले! म्हणूनच — या प्रकल्पाकडे पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग व्हावे या संत तुकारामाच्या विचारातूनच पहावे आणि हा प्रकल्प यशस्वी करावा असे उपस्थिताना आवाहन केले!लायसच्या या उपक्रमास मावळ तालुका सभापती सौ निकिता घोटकुले यांनीही या प्रकल्पास शुभेच्छा दिल्यात!

या लायन्स महिला सबलीकरण केंद्र उभारणीस लायन मनोहर दाभाडे लायन भरत पोद्दार लायन प्रकाश पटेल लायन डॉक्टर सचिन पवार ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे चेअरमन लायन शेखर चौधरी माजी झोन चेअरमन सौभाग्यवती ला प्रमिला वाळुंज ला.अनिता बाळसराफ लायन सुनील वाळुंज निवृत्त पोलीस अधिकारी लायन मोहन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलेत! तसेच ग्रामस्थांपैकी उद्योजक योगेश कारके श्री समीर खिलारी चंद्रकांत चांदेकर यांचेही या प्रकल्पास लक्षणीय योगदान लाभले म्हणूनच हा कायमस्वरूपी प्रकल्प यशस्वी झालेला आहे!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!