Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची प्रभाग निहाय पदाधिकारी निवड जाहीर …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या प्रभाग निहाय पदाधिका-यांची निवड नुकतीच जाहीर करणेत आली. कर्मचारी महासंघाचे कामकाज सुलभरीत्या व्हावे तसेच संघटनेचा विस्तार वाढावा या उदेशाने कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. अंबर चिंचवडे यांनी एकूण आठ ही प्रभागाची कार्यकारिणी निश्चित करून त्यातून पदाधिका-यांची निवड केली.

ह क्षेत्रीय कार्यालय व ड क्षेत्रीय कार्यालय येथील नवनियुक्त पदाधिका-यांचा नामोल्लेख असलेल्या फलकाचा आनावरण समारंभ आज दिनांक ०२/११/२०२० रोजी आयोजीत करणेत आला होता. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या फलकाचे अनावरण हर्षल ढोरे, प्रभाग अध्यक्ष ह क्षेत्रीय कार्यालय यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या फलकाचे अनावरण  सागर आंगोळकर प्रभाग अध्यक्ष ड क्षेत्रीय कार्यालय यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ह क्षेत्रीय अधिकारी संदिप खोत, ड क्षेत्रीय अधिकारी गावडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे तसेच प्रभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच महासंघाचे पदाधिकारी वहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

ह क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष पदी श्री. निलेश घुले, उपाध्यक्ष पदी श्री. आनंद कांबळे, सचिव पदी श्री. संजय सावंत, सहसचिव पदी श्री. अक्षय ओव्हाळ, संघटक पदी श्री. सुनिल वालकोळी, व प्रवक्ता म्हणून श्री. उद्धव डवरी यांची निवड झाली तसेच ड क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष पदी श्री. महेश महाडीक, उपाध्यक्ष पदी श्रीम. पल्लवी बोराडे, सचिव पदी श्री. बाळासाहेब कलाटे, सहसचिव पदी श्री. विश्वनाथ काळे, संघटक पदी श्री. शांताराम माने, व प्रवक्ता म्हणून श्री. सोमनाथ नवले यांची निवड करणेत आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!