Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरवमधील काटेपूरम चौकातील खड्ड्यास पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार जबाबदार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असतानाच,यंदा खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला; त्यामुळे सर्वत्र खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पिंपळे गुरव मधील काटे पूरम चौकाकडून मयूर नागरिकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीत निर्माण झाला आहे. तसेच काटेपुरम चौक ते काशी विश्वेश्वर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही काही भाग हा सिमेंट काँक्रिट करण्याचा राहिला असून, सदर ठिकाणी यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

काटे पुरम चौक ते मयूर नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यायाबाबत माहिती घेतली असता यासंदर्भात या रस्त्याचे काम हे महापालिका स्थापत्य विभागा अंतर्गत येत असून रस्ता खराब असलेली जागा ही खाजगी मालकीची असून त्या जागेचा ताबा जागा मालकांनी महानगरपालिकेला देण्यासाठी तयारीही दर्शविली परंतु मनपा प्रशासन अजूनही त्यांना त्याबदल्यात मोबदला देण्यासाठी तयार नाही, या महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जनतेला नाहक त्रास होत आहे.

Google Ad

त्यामुळे खड्डे मुक्त करण्यासाठी स्थानिक नगरसेवक पाठपुरावा करूनही महापालिका यागोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे, हे नागरिकांना कोण सांगणार? आणि या रेंगाळलेल्या कामामुळे वारंवार होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण?

त्यामुळे काटेपूरम चौकातील हे खड्डे महापालिकेने बुजवणे आणि परत ते उखडणे हे नित्याचे झाले आहे. असे दुष्टचक्र महापालिकेत असून, आता खड्डे बुजवणे जमत नसेल तर मात्र डांबर तरी करून द्या, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

34 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!