Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्तांनी केले फेरबदल … कोणाला मिळाला, कोणता पदभार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी – चिंचवड महापालिकेतील उपायुक्त , सहाय्यक आयुक्त आणि प्रशासन अधिका यांच्या कामकाजाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेरबदल करत फेरवाटप केले आहे . या फेरबदलानुसार बढती मिळालेल्या उपायुक्तांकडील महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयांचा भार कमी केला गेला आहे .

प्रशासकीय पदाचा आजवरचा अनुभव पाहता, प्रशासन अधिकारी राजेश आगळे यांना सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती दिली असून, त्यांच्याकडे झोनिपू विभागाच्या कामकाजासह प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे .सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागासह निवडणूक, आधार कार्ड योजना  , प्रशांत जोशी यांच्याकडे भूमी आणि जिंदगी , माहिती व जनसंपर्क विभाग , सीताराम बहुरे यांच्याकडे ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे . दिलीप आढारी यांच्याकडे करसंकलन मुख्य कार्यालय , वामन नेमाणे यांना प्रशासन विभाग देण्यात आला आहे . अण्णा बोदडे यांच्याकडे ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालय , नागरवस्ती, जनगणना व नागरवस्ती विभागाकडील दिव्यांग विभागाचे कामकाज देण्यात आले आहे .

Google Ad

उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडे करसंकलन व अभिलेख विभागाची जबाबदारी कायम ठेवली असून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार कमी केला आहे . चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे कामगार कल्याण व कायदा विभागाच्या कायदा सल्लागार या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे, तर ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी कमी करण्यात आली आहे . संदीप खोत यांच्याकडे क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे . सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्याकडील झोनिपू विभाग काढला असून त्यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज दिले आहे .

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!