Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने केले एकदिवसीय लक्षणिक उपोषण … कोणी-कोणी दिला पाठिंबा, काय आहे? मागणी …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्थापनेवरील कायमस्वरूपी कामकाज करणा – या सुमारे ८५०० व ६५०० सेवानिवृत्त कर्मचा – यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरदायीनी असलेली “धन्वंतरी स्वास्थ योजना’ बंद करून त्या ऐवजी खाजगी विमा योजना लागू करणेचे एकतर्फी आदेश कर्मचा – यांना विश्वासात न घेता मनपा प्रशासनामार्फत दिनांक ०४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला . पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने त्यास तीव्र विरोध दर्शविण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले .

तसेच त्या विरूध्द न्यायालयीन लढा सुरू असून मे . कामगार न्यायालय येथुन स्थगिती आदेश देखील घेतले असल्याचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर किसनराव चिंचवडे यांनी सांगितले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीच्या आऊट गेट जवळ कर्मचारी महासंघाच्या पदाधिका – यांमार्फत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी स . १०.०० ते सायं . ६.०० या वेळेत करणेत आले . त्यावेळी पिंपरी चिंचवड मनपातील सर्वच विभागातील कर्मचारी उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते .

Google Ad

सदर उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे , माजी महापौर योगेश बहल , माजी महापौर मंगलताई कदम , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , माजी विरोधी पक्षनेते नाना काटे , शिवसेना गटनेते मा . राहुल कलाटे , माजी उपमहापौर तुषार हिंगे , गटनेते अपक्ष आघाडी कैलास बारणे , मनसे गटनेते सचिन चिखले , कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रशांत शितोळे , नगरसदस्य विनोद नढे , नगरसदस्य समिर मासुळकर , नगरसदस्य राहुल भोसले , नगरसदस्य शितल शिंदे , नगरसदस्य संदिप वाघेरे , नगरसदस्य मयुर कलाटे

नगरसदस्य विक्रांत लांडे , नगरसदस्य संगिता ( नानी ) ताम्हाणे , माजी नगरसदस्य मारुती भापकर , माजी नगरसदस्य अनंत कोहाळे, बाबा कांबळे , अध्यक्ष कष्ठकरी कामगार पंचायत , राजू सावळे उपाध्यक्ष मनसे , सामाजिक कार्यकर्ते मा . विश्वनाथ जगताप , आर.पी.आय. युवक आघाडीचे श्री.व्हावळकर , बहुजन वंचित संघटनेचे गुलाब पानपाटील तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे शिवाजी तापकीर , अण्णा कापसे , डी . डी फुगे अशा अनेक सन्माननिय सदस्यांनी उपस्थित राहून पाठींबा दर्शविला . सदर उपोषणाचा समारोप माजी महापौर मा . योगेश बहल व शिवसेना गटनेते मा . राहुल कलाटे यांचे हस्ते पदाधिका – यांना लिंबू पाणी देऊन करणेत आला .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!