Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pimpri Chinchwad

तळवडे पुलाखालील दगडाने ठेचुन विद्रुप केलेल्या खुनाचे गुन्हयातील आरोपी २४ तासाचे आत गजाआड

महाराष्ट्र 14 न्यूज, ( १३ फेब्रुवारी२०२१ ) : रोजी देहुरोड पोलीस ठाणे हददीतील तळवडे चाकण रोडवरील तळवडे ब्रिज खाली तळवडे स्मशान भुमीकडे जाणारे कच्चे रोडवर एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय- अंदाजे ३० ते ३५ वर्षे याचा दगडाने चेहरा ठेचुन अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी अनोळखी इसमाचा खुन केला आहे . सदर बाबत देहुरोड पोलीस ठाणे येथे गु.र.नं .७८ / २०२१ भा.दं.वि.कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

नमुद गुन्हयातील अनोळखी मयत याचा चेहरा पुर्णपणे ठेचून विद्रुप केल्यामुळे सदर मयताची ओळख पटत नव्हती सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सहायक पोलीस आयक्त गुन्हे १ व गुन्हे शाखा युनिट १ ते ५ याचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वेगवेगळया टिम तयार करुन गुन्हा उघडकीस आण्ण्याकरीता मार्गदर्शन सुचना दिलेल्या होत्या . मयताची ओळख पटवून गुन्हा उघड करणे बाबत पिंपरी चिंचवड परीसरात अधिक तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज – हाड यांना त्यांचे खास गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली की , तळवडे ब्रिज खाली दगडाने ठेचलेला मृतदेह हा संकेत गायकवाड रा.निघोजे ता.खेड जि.पुणे याचा आहे.

Google Ad

त्या बाबत तात्काळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर गुन्हे शाखा युनिट ३ यांना माहीती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे निघोजे गावात जावून मयताबाबत माहीती घेउन विचारपुस केली असता गावातील त्याचा नातेवाईक यांचे सोबत त्यांची जमिनीचे कारणावरुन काही वर्षापासून वाद व तक्रार असले बाबत महत्वपुर्ण माहीती प्राप्त झाली . मयत नामे संकेत गायकवाड याचा वाद असलेले संशईत आरोपी १ ) रोहन रवींद्र जगताप वय -२० वर्षे रा.निघोजे ता.खेड जि.पुणे २ ) विशाल अशोक चव्हाण वय -२१ वर्षे रा.देहुगांव ता.हवेली जि.पुणे

यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडे तपास केला असता प्रथमतः त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून सदरचा मयत व्यक्ती हा माझा जवळचा मावस भाउ असून त्याला कोणी मारले ? असा कांगावा करुन दुख झाल्याचाचे भासवुन मोठमोठयाने रडून तपास पथकाची पुर्णपणे दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला . परंतु युनिट ३ कडील तपास पथकाने संशयीत आरोपीकडे कौशल्यपुर्ण इंट्रॉगेशन केल्याने संशयीत आरोपी यांनी सदरचा गुन्हा मी व माझे दोन साथीदार विशाल चव्हाण व महाराज यांनी मिळून मागील काही वर्षापुर्वीचे जुन्या जमिनीचे वादाचे कारणातुन तसेच काही महीन्यापुर्वी आरोपी रोहन जगताप याचे आईस मयत नामे संकेत गायकवाड रा.निघोजे यांनी पोटात लाथा बुक्यांनी मारहण करुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती याचा राग मनात धरुन आरोपी रोहन जगताप याने मयताचा खुन करण्याचे ठरविले होते .

दि .१२ / २ / २०२१ रोजी आरोपी व त्याचे साथीदार हे निगडी ओटास्किम येथून निघोजे गावाकडे येत असताना तळवडे ब्रिजचे पुढे मयत संकेत गायकवाड हा तेथे उभा असल्याचे दिसला तेथे थांबुन आरोपींनी त्याचेशी गोड बोलुन त्याला तळवडे ब्रिजचे खाली घेवून गेले व माझे आईला गेल्या दोन महीन्यापुर्वी तु शिवीगाळ करुन मारहाण केली त्याबाबतचा आरोपींनी वाद उकरुन काढुन दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली व त्याचा चेहरा ओळखुन न येण्यासाठी त्याचे तोंडावर मोठमोठी दगडे टाकुन त्याचा खुन केल्याची धक्कादायक कबुली दिली . अशाप्रकारे अनोळखी मयताची ओळख पटवून अज्ञात आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण इंट्रॉगेशन व माहीती काढण्याचा पारंपारीक पध्दतीचा वापर करुन सदरचा क्लीष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे .

सदरचे आरोपींना रिपोर्टसह देहुरोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही मा . पोलीस आयुक्त , श्री . कृष्ण प्रकाश , मा , अपर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री . सुधिर हिरेमठ , सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे ) डॉ . प्रशांत अमृतकर , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बावर , पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज हाड , पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले , यदु आढारी , हजरतअली पठाण , सचिन मोरे , योगेश्वर कोळेकर , राजकुमार हनमंते , त्रिनयन बाळसराफ , प्रमोद ढाकणे , जगदीश बुधवंत यांनी केली आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

79 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!