Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : गुरुवार १ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरूवार ( दि. १ ऑक्टोबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ६३३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२३६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेल रुग्ण हे च-होली ( पुरुष ६३ वर्षे ) , दिघी ( पुरुष ७२ वर्षे ) , थेरगांव ( पुरुष ७२ वर्षे ) पिंपळे गुरव ( पुरुष ६१ वर्षे , स्त्री ७० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवर हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे चाकण ( पुरुष ५८ वर्षे ) पाषाण ( स्त्री ७६ वर्षे ) पुणे कैम्प ( पुरुष ८८ वर्षे ) रांजणगांव ( पुरुष ७० वर्षे ) येथील रहिवासी आहे .

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांब्दारे १८७ ९ २१७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १३०४ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता २८६ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!