Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … शनिवार, ०२ जानेवारी २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार, ( दि. २, जानेवारी २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात १२८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १२३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०५ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – बालाजीनगर (५८ वर्षे), आकुर्डी (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – खेड (५७ वर्षे), जुन्नर (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १४ प्रवाशी भारतात परतलेले नाहीत, ५० प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत व १६ प्रवाशांचा २८ दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. उर्वरीत १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १८१ नकारात्मक असून ७ अहवाल कोविड सकारात्मक आहे उर्वरित ० अहवाल प्रलंबित आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

100 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!