Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि. १६ नोव्हेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ९३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून उपचार सुरू आहेत. तर ८८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष -चिंचवड ( ६० वर्षे ) , काळेवाडी ( ४३ वर्षे ) ०१ स्त्री- पिंपळे गुरव ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

कोविड -१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोना बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो , ही बाब लक्षात घेऊन फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे .

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे सातत्याने प्रयत्न केले जात आहे . विविध स्तरावर अहोरात्र केलेले प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या कोवीड नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे . असे असले तरी कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे .

शारिरीक अंतरभान , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा नागरिकांनी अवलंब करावा असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले . कोविड बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा अथवा कमीत कमी करावा . लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घ्यावा असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!