Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शहरात आज १८११ नागरिक कोरोनाच्या विळख्यात … तर ७ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (२५ मार्च २०२१) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि.२५ मार्च २०२१ ) रोजी १८१८ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १८११ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०७ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ७२२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – संत तुकाराम नगर ( ७२ वर्षे ) , फुगेवाडी ( ५ ९ वर्षे ) , पिंपरी ( ७८ वर्षे ) , चिंचवड ( ७८ वर्षे ) , सांगवी ( ६४ वर्षे ) ०२ स्त्री पिंपरी ( ६५ वर्षे ) , दिघी ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – जुन्नर ( ६५ वर्षे ) , पाबळ ( ७६ वर्षे ) , खडकी ( ५३ वर्षे ) , पुणे ( ७२ वर्षे ) , ०२ स्त्री – चाकण ( ५७ वर्षे ) , पुणे ( ५६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २३१
ब – ३४६
क – १४६
ड – २९८
इ – १७४
फ – २०१
ग – २७४
ह – १४१
एकुण – १८११

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!