Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे पिंपरी चिंचवड आयुक्तांनी दिले सुधारीत आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोवीड -१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सजगतेने व सतर्क राहून नाताळ सण साजरा करणे बाबत आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निर्गमित केले आहेत . कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या नाताळ सणा मध्ये नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे .

प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरीकांच्या सहकार्यामुळे सध्या कोविड- १९ नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारी वरुन दिसत असले तरीही , कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटोकोरपणे घेणे गरजेचे आहे . ही बाब लक्षात घेऊन सामाजीक अंतर , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे याबाबींचा अवलंब कारवयाचा आहे . तसेच फटाक्यांच्या धुराचा कोविड- १९ बाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये . वरील अनुषंगाने व्यापक लोकहीताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहुन नाताळ सणाचा आनंद घेता यावा , यासाठी आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

Google Ad

🔴अशी घ्या खबरदारी आणि काळजी :-

१ ) ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा
२ ) नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तित जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे . चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजीक अंतर राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी .
३ ) चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी . तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे .

४ ) नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येणूंच्या जीवनावरील देखावे , ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात . त्या ठीकाणी सामाजीक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात .
५ ) चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत ( Choir ) गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा ( Choristers ) समावेश करण्यात यावा . यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे .
६ ) चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यात येऊ नयेत . ६० वर्षावरील नागरिकांनी तसेच १० वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्ये साजरा करावा .

७) आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची ( Online Masses ) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी .
८ ) सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे .
९ ) कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक / सांस्कृतीक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये .
१० ) फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये . ध्वनी प्रदुषणासंदर्भात नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे .

११ ) ३१ डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजीत करण्यात येणारी प्रार्थना ( Thanks Giving Mass ) ही मध्यरात्री आयोजीत न करता संध्याकाळी ७.०० वाजता किंवा त्यापुर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे .
१२ ) कोविड – १ ९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच पिं . चि . मनपा , पोलिस यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर अनुपालन करणे बंधनकाराक राहील .

१३ ) तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे .
१४ ) यापुर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम , त्याकरीता निर्गमित केलेल आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील .
१५ ) संदर्भिय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .
१६ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

कोवीड -१९ च्या प्रतिबंधासाठी पिंपरी चिंचवड मनपा द्वारे वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारा व्यक्ती , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील . हे आदेश दि . २४/१२/२०२० पासून पुढील आदेश होई पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील, असे पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कळविले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!