महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१४ एप्रिल) : पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त दापोडीत महाराष्ट्र पोलीस दलातील आनंद अनगळ, निवास रोकडे, प्रशांत साबळे, हनुमंत मिटके व गोपाळ मोरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपळे गुरव येथील अनाथ अंध मुलांना कोरोनामुळे या अन्न धान्य यांची कमतरता भासू नये यासाठी अन्नधान्य वाटत करण्यात आले तसेच ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार २०२१’ देऊन पत्रकार रमेश मोरे (सकाळ), संतोष महामुनी (लोकमत), डॉ.देविदास शेलार (महाराष्ट्र 14 न्यूज) या पत्रकारांना विशेष सन्मानित करण्यात आले .
तर खेळाडू गणेश जाधव, आशिष उबाळे, उमेश जाधव, योगेश बोऱ्हाडे यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गोपाळभाऊ मोरे व पोलीस निरीक्षक आनंद अनगळ यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी कमलेश पिल्ले मनोज उपार बाळासाहेब जगदाळे दिलिप निकाळजे राजु वाळुंजकर कदि उपस्थित होते.
72 Comments