Google Ad
Editor Choice

टॅक्टिकल मुव्हस चेस अकॅडमी तर्फे आयोजित, पिंपरी चिंचवड येथे पहिल्या फिडे रेटिंग स्पर्धेत पि.सी.एम.सी. महाराष्ट्राचा कुशाग्र जैन विजेता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२१ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड येथे झालेल्या टॅक्टिकल मुव्हस चेस अकॅडमी तर्फे आयोजित रेटींग स्पर्धेत अंतिम फेरीत, पहिल्या टेबलावर पश्चिम बंगालच्या अर्पण दासने 7 गुण होते व तो PCMC च्या कुशाग्र जैनने 8 गुण मिळवत त्याला हरवले. 2ऱ्या पटावर विक्रमादित्यने 7.5 गुण मिळवले आणि कालच्या संयुक्त आघाडीवरील श्रायन ला पराभूत करून त्याला 7 गुणांवरच समाधान वाटले.आणि तिसऱ्या पटावर दिल्लीच्या साची जैनने 7 गुण मिळवले व तिने विरेश सोबत बरोबरी साधली ज्यामुळे विरेश्ला 7.5 गुणावर समाधान मानावे लागले.

पीसीएमसी महाराष्ट्रच्या कुशाग्र जैन याने जिंकलेल्या चॅम्पियनशिपने 8 गुण मिळवून 40000 रुपये आणि चमकदार करंडक पटकावले तर द्वितीय क्रमांक रेल्वे महाराष्ट्राच्या IM विक्रमादिता कुलकर्णीने 7½ गुण मिळवून 25000/- ट्रॉफीसह, तृतीय क्रमांक पुण्याच्या वीरेश शरणार्थीने पटकावला. 7½ गुणांनी 15000/- आणि ट्रॉफी जिंकली.

Google Ad

यावेळी फिडे प्रशिक्षक प्रतीक मुळे – टॅक्टिकल मूव्ह्स चेस अकादमीचे संस्थापक, खंडुशेट चिंचवडे -चिंचवडे लॉन्सचे मालक, राजेंद्र गावडे -म. नगरसेवक, सचिन चिंचवडे – मा. नगरसेवक व माजी महापौर, योगेश चिंचवडे या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. टॅक्टिकल मुव्हस चेस अकॅडमी तर्फे सर्व विजेत्यांना एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयेची रोख बक्षिसे व ट्रॉफी  देण्यात आली. तर श्रीमती अश्विनीताई चिंचवडे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!