Google Ad
Editor Choice Education

नवी सांगवी येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ नोव्हेंबर) : दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळावा व महाराष्ट्रात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे द न्यू मिलेनिअम इंग्लिश मीडियम स्कूल समर्थ नगर नवी सांगवी येथे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ता.४ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या रोजगार मेळाव्यास सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी डॉ. गणेश अंबिके ९४२२ ०३६६२९ व विशाल डोंगरे ८४२१९०४८५५ तसेच भाजपचे माजी नगरसेवक यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मेळाव्याचे संयोजक चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement