Google Ad
Editor Choice Maharashtra

Purandhar : छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडीवरील नावाला विरोध , शिवधर्म फौंडेशनच्या उपोषणाला शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा महाराष्ट्रभर जाहीर पाठिंबा !

महाराष्ट्र 14 न्यूज : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव व यांच्या नावाचा गैरवापर हा गेल्या अनेक शतकांपासून संभाजी बिडी या धूम्रपानाच्या पॅकेजिंग वरती होत आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील आणि तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार संभाजी बिडी ही कंपनी करत असून या कंपनीच्या उत्पादनाला नाव बदल करण्यास अनेक वेळा सांगण्यात आले परंतु याची दखल ना सरकार ना कंपनीच्या मालकांनी घेतली त्यामुळे आज अखेर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक पद्धतीने उपोषण करण्यात येणार असून या उपोषणाला श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य तसेच अमोल दादा गायकवाड मित्रपरिवार भिगवण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिवधर्म फाउंडेशन ला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

हे आंदोलन पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी चालू असून लवकरात लवकर संभाजी बिडी हे नाव काढून टाकण्यात यावे अन्यथा सरकारला आणि कंपनीला महागात पडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांनी यावेळी केला. या वेळी उपोषणाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, भिगवण संपर्क प्रमुख विशाल धुमाळ, इंदापुर तालुका अध्यक्ष मनोज राक्षे, लोणी देवकरचे उद्योजक विजय डोंगरे, भिगवण शहराध्यक्ष सुरज पुजारी, सरपंच पप्पू थोरवे, सदस्य राहुल ढवळे, ज्ञानेश्वर सोळंके, विराज डोंगरे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

Google Ad

तसेच छत्रपतींच्या नावाचा यापुढे कोणी गैरवापर केल्यास आम्ही कोणत्याही पक्षाला किंवा कोणाला थारा देणार नसल्याचे शिवशंभू ट्रस्टचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी सांगितले, त्याचप्रमाणे विशाल धुमाळ यांनी ही यावेळी आम्ही आता शांत बसणार नाही सरकार झोपले आहे आता तरी जागे व्हा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. त्याप्रमाणे श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनीही शिवधर्म फाउंडेशनला आमचा महाराष्ट्रभरात बीड, अहमदनगर, बारामती, इंदापुर इथून शेवटपर्यंत पाठिंबा असेल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

120 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!