Google Ad
Editor Choice Maharashtra

एकदाच ठरलं … एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम … शुक्रवारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे, अशी घोषणाच त्यांनी आज केली.

नाथाभाऊ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असंही जयंत पाटील म्हणालेत.

Google Ad

आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!