Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने दापोडी येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त … आरोग्य सेवा पुरस्कार २०२१ !

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

महाराष्ट्र 14 न्यूज : पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत दापोडी येथे नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने कोरोनाच्या काळात सेवा करणाऱ्यांना ‘आरोग्य सेवा गौरव पुरस्कार २०२१’ देण्यात आले.

या सत्कार समारंभ प्रसंगी विनोद बेंडाळे, रमेश भोसले, उमेश जाधव, दिपक माकर, आनंद कांबळे, रश्मी पूंडलवार, नंदु भालेराव, मोहन साबळे यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी संयोजक नगरसेवक राजु बनसोडे , गणेश ढमाले अध्यक्ष माथाडी कामगार संघटना तसेच जेष्ठ नागरिक संघ दापोडी चे जयवंत मोरे, सुभाष शहा उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना ‘नगरसेवक राजु बनसोडे’ म्हणाले, “आज कोरोनाच्या आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले, पिंपरी चिंचवड शहरातही रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असे असताना आरोग्य कर्मचारी आपली सेवा सर्व ताकतीने व आपल्या जिवाची पर्वा न करता करतात, आपले कुटुंब परिवार घरी असताना तुमच्या आमच्या परिवारासाठी झटत असतात अशा करोना योध्दाचा सन्मान प्रत्यकाने केला पाहिजे. समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेतून तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्य करण्याची आज गरज आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!