Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘शरद पवार’ यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सफाई कामगारांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, शहरातील पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धा सफाई कामगार व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राजेंद्र जगताप, श्याम जगताप, राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, उद्योजक महेंद्रसिंग आदियाल, तृप्ती जवळकर, अतुल काशीद, रामदास पांढरे, नयन अहिरे, गणेश जगताप, आदी उपस्थित होते.

Google Ad

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पाडुळे यांनी केले. त्यांनी सांगितले, की आज जो पिंपरी चिंचवड शहर परिसराचा विकास झालेला दिसत आहे, तो केवळ शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे झालेला आहे.

तानाजी जवळकर यांनी सांगितले, की कोरोनाजन्य परिस्थिती असतानाही परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम आरोग्य कर्मचारी अहोरात्र करीत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे उचित आहे.

संदेश नवले म्हणाले, की बहुतांश महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. महिलांनी काम करीत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत फक्त आरोग्य कर्मचारीच ठेऊ शकतात. आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, यात शंका नाही.

श्याम जगताप यांनी सांगितले, की समाजात स्वच्छता ठेवण्याचे मोठे काम आरोग्य कर्मचारी अहोरात्र करीत असतात. मात्र, त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. त्यांच्या कामाचे योग्य मोल होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन तानाजी जवळकर, श्याम जगताप, अमरसिंग आदियाल यांनी केले. आभार अमरसिंग आदियाल यांनी मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!