Categories: Uncategorized

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर….

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ जानेवारी २०२६ -* पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून सदर सार्वजनिक सुट्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात लागू राहणार आहे.

सदर सार्वजनिक सुट्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना लागू राहील. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. तरी १५ जानेवारी २०२६ या सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

5 days ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

6 days ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

7 days ago

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

4 weeks ago