Categories: Uncategorized

मतदार यादी मधील नाव शोधणे बाबत ऑनलाईन सर्च सुविधा… मतदार यादीत असे शोधा आपले नाव

महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी दि.६ जानेवारी २०२६:-* चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत महानगरपालिकेने आपल्या शहरातील नागरिकांना मतदार यादी मधील आपले नाव व मतदान केंद्र शोधणे बाबत मनपा संकेतस्थळावर ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मतदारांना मतदार यादी मधील भाग क्रमांक व अनुक्रमांक या बरोबरच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता ठळकपणे दिसून येणेकामी लाल रंगात उपलब्ध होणार आहे.
सदर सुविधा वापरणे साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांना मनपाचे संकेतस्थळ http://www.pcmcindia.gov.in यावर उपलब्ध असलेल्या मतदार नाव शोधणे (search voter name) या लिंक वर, सुविधा उपलब्ध असणार आहे
मतदारांचे नाव शोधताना मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये मतदारांचे नाव सर्च करणे शक्य होणार आहे, मतदारांना आपला मतदान ओळखपत्र क्रमांक माहीत असल्यास त्यानुसार देखील शोध घेण्याची सुविधा उपलब्ध आहे

प्रभाग क्रमांक निवडून मतदाराचे प्रथम नाव, मधील नाव व आडनाव यांची नोंद केल्यानंतर संबंधित मतदाराचे मतदान केंद्र व इतर सर्व माहिती सर्च द्वारे उपलब्ध करण्यात आलेली आहे.
महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाइन ला फोन करून ८८८८००६६६६ (8888006666) देखील आपण आपले मतदार ओळख क्रमांक अथवा संपूर्ण नाव सांगून सदर सुविधेचा लाभ घेऊ शकता, संबंधित सारथी कॉल ऑपरेटर आपल्याला माहिती सर्च करून देण्यास मदत करेल.
सदरची सेवा शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्या कामी उपयोगी ठरावी या उद्देशाने सदर सेवेचा शुभारंभ मा. श्री. श्रावण हर्डीकर, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हस्ते आज करण्यात आला.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago