Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १ कोटींची वाढ; नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे महसुलात भर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १ एप्रिल २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत सुमारे २१ कोटी ५० लाख रुपयांची वसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षात विभागाची वसुली २० कोटी ५५ लाख रुपये इतकी होती. त्या तुलनेत यंदा सुमारे १ कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली असून विभागाच्या महसूलवाढीचा हा विक्रमी टप्पा मानला जात आहे. या वाढीमुळे महापालिकेच्या आर्थिक बळकटीकरणास हातभार लागणार असून विविध विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

चालू आर्थिक वर्षात विशेषतः ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत विभागाने दंड व जाहिरात परवाना विलंब शुल्काच्या माध्यमातून ६२ लाख ३७ हजार ३२९ रुपयांची वसुली केली आहे. नियमांचे काटेकोर पालन, थकबाकी वसुलीवर दिलेला भर तसेच अनधिकृत जाहिरातींवर करण्यात आलेली कारवाई यामुळे या उत्पन्नात वाढ झाली आहे. याचबरोबर जाहिरात परवाना शुल्कातून १९ कोटी ८१ लाख रुपये, जाहिरात फलक भाडे शुल्कातून ५१ लाख ६४ हजार रुपये आणि जाहिरात कराद्वारे १० लाख रुपये इतके उत्पन्न विभागास प्राप्त झाले आहे. विविध उत्पन्न स्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन आणि नियमित तपासणी मोहिमा यामुळे ही महसूलवाढ शक्य झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाने केलेल्या नियोजनबद्ध उपाययोजना, तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे महसूल वाढीस चालना मिळाली आहे. शहरातील जाहिरात फलकांचे नियमन, परवाना नूतनीकरणाची काटेकोर अंमलबजावणी तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई यामुळे विभागाच्या कामकाजात शिस्तबद्धता आली आहे. परिणामी, उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे.

महापालिकेच्या महसूलवाढीसाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाने केलेली ही कामगिरी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून ती प्रशासनाच्या शिस्तबद्ध आणि परिणामकारक कामकाजाची साक्ष देणारी आहे. नियमांचे काटेकोर पालन, अनधिकृत जाहिरातींवर केलेली कारवाई आणि परवाना प्रक्रियेत आणलेली पारदर्शकता यामुळेच ही विक्रमी वाढ साध्य झाली आहे. या वाढीव उत्पन्नामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि विकासकामांना अधिक गती देणे शक्य होणार आहे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

महसूल वाढीसाठी पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी या बाबींवर सातत्याने भर देण्यात येत आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाची यंदाची कामगिरी ही या धोरणांचाच परिणाम आहे. पुढील काळात महसूलवाढीसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येईल.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

थकबाकी वसुलीवर विशेष लक्ष, परवाना नूतनीकरणाची काटेकोर अंमलबजावणी आणि नियमभंगाविरुद्ध तात्काळ कारवाई यामुळे विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आगामी काळातही कार्यक्षमता वाढवून महसूल अधिकाधिक वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– राजेश आगळे, उप आयुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago