Categories: Uncategorized

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली. विजय सूर्यवंशी असे बड्या आयएएस अधिकाऱ्यांचे नाव आहे. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियु्क्ती झाली आहे. याआधी श्रावण हर्डीकर हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभारी आयुक्त होते. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेला विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.

डॉ. सूर्यवंशी हे २००६ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे त्यांनी पीएच.डी. (व्यवस्थापन), एमबीए (मार्केटिंग), एलएलबी आणि बीएससी (फिजिक्स) असे शिक्षण पूर्ण केले आहे.

९ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रभावी प्रशासनाची छाप पाडली. पिंपरी चिंचवड शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पर्यावरणीय प्रश्न आणि वाढती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांसमोर मोठी प्रशासकीय आव्हाने असणार आहेत.

जिल्हा परिषद कोल्हापूर व पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांना गती दिली. त्यानंतर गोंदिया आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासनातील पारदर्शकता व विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असताना विभागातील प्रशासन सुसूत्र करण्याबरोबरच विविध विकास योजनांवर त्यांनी विशेष भर दिला.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago