Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अंघोळीची गोळीच्या वतीने … पुन्हा एकदा खिळेमुक्त झाडं अभियान नव्या, आक्रमक रूपात

महाराष्ट्र 14 न्यूज : खिळेमुक्त_झाडे हे अभियान निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांच्या पुढाकाराने घेतलेली छोटीशी चळवळ आहे. झाडांद्वारे नैसर्गिक आँक्सिजन मिळत असतो व याच झाडांना जपण्यासाठी आपण कमी पडत आहोत. झाडांनाही वेदना होतात हे प्रा. जगदिश बोस यांनी सिध्द केलंय. मग अश्याप्रकारे झाडांना खिळे ठोकुन वेदना देणे कितपत योग्य आहे हा विचार केला पाहिजे.

आत्ता सुरु असलेल्या कोरोनाच्या या संकटात आपण आँक्सिजन मिळवण्यासाठी मोजलेली किंमत पाहिली आहे. मग आँक्सिजनचे नैसर्गिक स्त्रोत असलेल्या झाडांची निगा राखणे हे आपलेच काम आहे. पुढील पिढीसाठी आपण ही नैसर्गिक संपत्ती जपली पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे हा एकच उद्देश आहे. अश्याप्रकारे पर्यावरणाचा ह्रास करणारयांवर प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे.

Google Ad

आज पिंपरी चिंचवड काॅलेज आँफ इंजिनिअरींग आकुर्डी समोरील झाडांवरील खिळे काढून पुनःश्च आज या अभियानाला सुरुवात झाली. यावेळेस आंघोळीच्या गोळीच्या सोबत अनेक सामाजिक संस्थांचे पर्यावरण प्रेमी माधव पाणी, सचिन काळभोर राहुल धनवे, लालचंद मुथियान, आनंद पानसे, राजेंद्र बाबर, सचिन खोले, प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडु, रचना गुप्ता, रुपाली मगदुम, मोनाली मगदुम हजर होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!