Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव सृष्टी चौक येथे प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव सृष्टीचौक येथे प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने  सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या योगदानामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रात अव्वल असल्याने त्यांच्या कार्याप्रती वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी बोलताना नगरसेविका उषा मुंढे म्हणाल्या की ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिना निमित्त महिलांनी सक्षम होऊन केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे तर, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उज्वल कामगिरी करून देशाच्या जडणघडणी मध्ये योगदान दिले पाहिजे.

Google Ad

या कार्यक्रमाच्या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, प्रकाश कांबळे, ज्योती कोळी, संगीता बामगुडे, प्रतिभा चव्हाण, सुनिता कुवर, संगीता रावते, संगीता डीखळे, स्वाती गुरव, मनीषा हंगरगे, कल्पना शिंदे आदी महिला व मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!