Categories: Editor Choice

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी २४ x ७ कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. नुकतेच या दिनदर्शिकेचे प्रकाशन चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. सुषमाताई तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री. तानाजी जवळकर, श्री. नवनाथ जांभूळकर, श्री. मच्छिंद्र काटे, श्री. मनीष कुलकर्णी, श्री. दत्ता कदम, पै. संकेत विधाते, पै. हिमांशू जगताप, पै. शुभम पिंपळे, पै. अमन दळवी, पै. रोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दिनविशेष, पंचांग यांचा समावेश असलेल्या या दिनदर्शिकेचे पिंपळे गुरव परिसरातील २० हजार नागरिकांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिनदर्शिका वाटप करण्यात येत असल्याबद्दल पिंपळे गुरव परिसरामधील नागरिकांकडून शाम जगताप यांचे कौतुक केले जात आहे.

शाम जगताप युवा मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून जनतेच्या हितासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी शाम जगताप यांनी दिली.
सदर दिनदर्शिका दर्जेदार कागद व आकर्षक रंगसंगतीमध्ये दिनदर्शिकेची छपाई करण्यात आल्याने ती उठावदार व आकर्षक दिसून येत आहे. दिनदर्शिकेत वाचनीय व माहितीपूर्वक गोष्टींची माहिती तसेच शाम जगताप यांच्या सामाजिक कार्याची व विकास कामांची माहिती देण्यात आली आहे. शाम जगताप हे दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करीत असतात. दरवर्षी या दिनदर्शिकेची परिसरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. याही वर्षी त्यांनी २०२५ च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते केले आहे. जवळपास वीस हजार दिनदर्शिकेचे वाटप परिसरात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी शाम जगताप यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

4 weeks ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

4 weeks ago

४ वर्षांनं प्रशासकीय राजवट संपुष्टात.! पिंपरी चिंचवड’च्या महापौर पदी रवी लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर…

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड*…

1 month ago

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी नंतर पिंपरी चिंचवडमधील विकासकामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी “मॅरेथॉन बैठक” घेत शहरातील नागरिकांसाठी केल्या या मागण्या

किवळे, रावेत, मामुर्डी आणि  पुनावळ्यातील रस्त्यांसह ''पब्लिक अमेनिटीज'' विकसित करण्याची प्रशासनाला सूचना सांगवी आणि औंध उरो…

1 month ago

पिंपरी चिंचवड युवा सेनेची आदरांजली … विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ फेब्रुवारी : पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

1 month ago